जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग तपासणी शिबीर  महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा पुढाकार ; शिबिराचा महिलांनी घेतला लाभ     

Rokhthok Maharashtra 19 0

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन                                                   

 महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्त जागतिक कर्करोग दिनी दि. ०४.०२ .२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र , भोंगवली अंतर्गत उपकेंद्र किकवी, ता.भोर, जि. पुणे येथे महाराष्ट्र आरोग्य मंडळ व आस्था संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ एकूण १०९ महिलांनी घेतला. यामधील काही महिलांना पुढील तपासणीचा सल्ला देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. सुशिल देशमुख , श्री. भगवान चौधरी, आस्था बेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप, पुणेच्या माधवी सागळे, निलिमा चौगुले, माधवी फडणीस तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किकवीच्या डॉ. मोनाली लोणकर, गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, पंचायत समिती भोरचे सभापती, श्रीधर  किंदरे व पंचायत समिती सदस्य रोहन भाटे उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.