रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
कात्रज हे पुणे शहरातील दक्षिण भागातील अत्यंत झपाट्याने विकसित होणारे उपनगर असल्यामुळे या परिसरात अनेक मध्यमवर्गीय लोकानी आपल्याला आर्थिक दृष्ट्या परवडेल अश्या किमती मध्ये जागा घेऊन स्वतःची घर उभारली आहेत हा परिसर पूर्वी ग्राम पंचायत असल्या पासून येथे नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात आहे.
सातारा,कोल्हापूर,भोर,या भागातील नागरिकांना कात्रज हे अत्यंत सोयीचे ठिकाण असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात लोक येथे राहण्यास आले आहेत.त्या मुळे जसजशी लोकवस्ती वाढली तसं तसे भाजी मंडई,बस स्थानक,शाळा अश्या विविध संलग्न व्यवस्था येथे मूळ धरू लागल्या याचा परिणाम पुढे असा झाला की,रस्त्यावर अनधिकृत पणे भाजी विक्रेते येऊन बसणे, रिक्षा स्थानक उभे राहणे,बस रस्त्यावर उभ्या करणे,खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करणे अश्या गोष्टी वाढल्यामुळे रस्त्याचे आकारमान कमी झाले व वाहतूक कोंडी ही नित्याची गोष्ट झाली आहे.रोज १२ तास कात्रज चौकातून आपले वाहन घेऊन जाणे अत्यंत जिकरीचे झाले आहे.
रस्त्यावर भाजी विक्री करणे अनधिकृत हातगाडी उभारणे अश्या गोष्टींमुळे उपलब्ध असलेला रस्ता अपूर्ण पडत आहे.व्यवसाय करणाऱ्या लोकांनी जरूर व्यवसाय करावा परंतु रस्ता अडवू नये
नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी २०१७ पासून पुणे महानगर पालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून येथे वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाण पूल उभारावा ही आपली मागणी लावून धरली आहे.
त्याना संबंधित शासकीय अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला आहे परंतु महानगर पालिकेच्या वतीने या उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी मनपा आयुक्त श्री शेखर गायकवाड यांना आज पुन्हा निवेदन द्वारे केली आहे.त्यांनी सुद्धा या विषयात मी लक्ष घालतो असे सांगितले आहे.
माझी ही एकच मागणी आहे की, “कात्रज कर नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीतुन बाहेर काढायचे असेल तर उड्डाण पूल उभारणे हा एकमेव पर्याय आहे.त्या साठी मनपाने पुढाकार घ्यावा.”
कात्रज मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल उभारावा ; नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांची मागणी

Related tags :
1.6K Comments
Oldest