किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न : पुण्यातील गुलटेकडी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

Rokhthok Maharashtra 33 0

पुणे :  – किरकोळ कारणावरून दोन सराईत गुन्हेगार आणि त्याच्यासाथीदाराने तरुणाच्या पोटात चाकू घुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गुलटेकडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी इस्माईल साहेबलाल पटेल (वय 17) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सन्नी कांबळे आणि गोविंदसिंग टाक तसेच साहिल या तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिविंदसिंग टाक आणि सन्नी कांबळे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान फिर्यादी इस्माईल हे त्यांचा मित्र तोहीद शेख याच्यासोबत गुलतेकडी येथील तांबोळी गल्लीत गप्पा मारत उभारले होते. यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. टाक व कांबळे यांच्यासोबत असणाऱ्या एकाने फिर्यादी तयाला धक्का यावेळी त्याने धक्का का मारला असे विचारले. त्यावेळी तूकोण कोण विचारणारास त्यावेळी आरोपीने परत धक्का देऊन तू कोण मला विचारणार असे म्हणतात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तर एकाने पोटत घुपसला. यात तो गंभीर झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात दाखल सुरू केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.