पुणे : हवेली तालुक्यातील थायरोकेअर या खाजगी प्रयोगशाळेने कोरोना संशयित व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह असताना जाणीवपूर्वक तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे सांगत फसवणूक केली. या प्रकरणात थायरोकेअर या खासगी प्रयोगशाळेचे कोरोना स्वॅब तपासणीचे कामकाज त्वरीत थांबविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील अहवालानुसार कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणाऱ्या आय.सी.एम.आर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापुर (ता.हवेली) येथील धुमाळ कुटूंबातील व्यक्तींनी कोरोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालाच्या निष्कर्षावर कुटुंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा पुणे येेेथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, सर्व धुमाळ कुटुंबाचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला असल्याने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
sprunki
What kinds of payment methods do you accept?