पुणे

हडपसर डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.ओंकार हरिदास यांची निवड

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
पुणे इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेतर्फे हडपसर मधील डेंटिस्टसाठी डेंटल एज्युकेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खिलारे आणि उपप्राचार्य डॉ. डोंगरे तसेच हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर सुमेधा संत यांचे स्लीप अँड टेम्पोरुमॅनडीबुलर जॉईंट यामधील कनेक्शन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले स्वागत सचिव डॉ. स्मिता झांजुरणे आणि खजिनदार डॉ. सौरभ बिर्ला यांनी केले आभार अध्यक्ष डॉ. जयश्री आव्हाड यांनी मानले.
डॉ. जयश्री आव्हाड यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने कार्यभार बाल दंतरोग तज्ञ डॉ. ओंकार हरिदास यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कोरोनाच्या संकटात थांबलेल्या संस्थेला नवसंजीवनी देऊन समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.ओंकार हरिदास, डॉ.स्मिता झांजुरणे तसेच डॉ.सौरभ बिर्ला यांच्यावर आहे.
डॉ. मंगेश वाघ डॉ. खिलारे आणि डॉ. डोंगरे, डॉ. प्रकाश केळकर, डॉ. विक्रम हरीपुरे आणि डॉ.वंडकर यांच्या हस्ते हडपसरच्या पहिल्या डेंटल मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले.
मॅगझिनमध्ये आपल्या डेंटल केसेस, लेख, कविता आणि इतर कला गुणांची माहिती पाठवून सहभागी झालेल्या सर्व जणांचे मॅक्झिन कमिटीतर्फे आभार मानण्यात आले. मॅक्झिन कमिटीमध्ये डॉ. अपूर्व साहू, डॉ. जागृती दहीलकर, डॉ. प्रतिक राऊत आणि डॉ. सोनम शिंदे यांचा समावेश होता. स्वतःची प्रॅक्‍टिस सांभाळून आपला वेळ देऊन मेहनतीने गेली चार ते पाच महिने या चौघांनी मॅगझिनच्या या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे यामध्ये नोबल हॉस्पिटल चे प्रमुख दंतरोग तज्ञ डॉ. अक्षय राऊत यांचे आर्थिक सहाय्य लाभले.
खजिनदार सौरभ बिर्ला, सचिव स्मिता झांजुरणे, व अध्यक्ष, ओंकार हरिदास यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक राऊत आणि डॉ. ममता ढवळे यांनी केले. उपस्थितांमध्ये नवनिर्वाचित स्पोर्टस सेक्रेटरी डॉ. सोनाली खेडकर कमिटी मेंबर डॉ. रोहित गांधी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. केदार केळकर, डॉ. निलेश फटाले, डॉ. नितीन सपट, डॉ. अजिंक्य निगडे आदींचा समावेश होता.
डॉ. मंगेश वाघ यांनी हडपसर मेडीकल असोसिएशनचा ऋणानुबंध डेंटल असोसिएशन बरोबर असाच कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. प्रकाश केळकर व डॉ. विक्रम हरीपुरे यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली.

Comment here

5
0
Would love your thoughts, please comment.x
()
x