महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली

Rokhthok Maharashtra 18 0

प्रतिनिधी  : स्वप्निल कदम

महाराष्ट्रामध्ये सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवर असलेले उत्पादन शुल्कामध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे राज्यात त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. “स्कॉच व्हिस्कीवर असलेले उत्पादन शुल्क उत्पादन खर्चामधून ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार की, गुरुवारी या संदर्भामध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आहेत. आयात करण्यात येणाऱ्या स्कॉचच्या विक्रीमधून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. या कपातीमधून सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढणार आहे.शुल्कामध्ये कपात केल्याने इतर राज्यामधून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रिला देखील मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाले आहेत. यामुळे राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. सध्या एका दिवसामध्ये १ लाख बाटल्या विकले जातात, शुल्क कमी केल्यावर बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर येऊन पोहोचू शकते.महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळत आहे. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे व्हिस्कीच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळणार आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.