कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथे हजरत महम्मद पैगंबर जयंती साजरी

Rokhthok Maharashtra 13 0

हवेली ता. प्रतिनिधी -अमन शेख

येथील मुस्लीम समाजाच्या वतीने हजरत महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. ९)
सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हजरत बागूल शाहवली दर्ग्यापासून मिरवणूक निघाली.
दरम्यान लोणी गाव ते कदमवाक-वस्ती अशी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी कदमवाकवस्ती माजी सरपंच नंदू काळभोर, व सरपंच गौरी गायकवाड, लोणी काळभोर सरपंच माधुरी काळभोर,ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे,शरीफ खान,सतिश काळभोर,समीर खान, यांच्याकडून ईद-ए-मिलाद निमित्त आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या

यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले
होते.
यावेळी लोणी काळभोर, कदमवाक-वस्ती येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थिती दर्शविली.परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन SDS फाऊंडेशन यांनी केले होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.