‘भाजप मित्रांनाच संपवतोय हे पुन्हा बिहारमध्ये सिद्ध झाले’ – आमदार रोहित पवार

Rokhthok Maharashtra 15 0

मुंबई – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा अधिक जागा जिंकून भाजप आता एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. सर्व २४३ जागांच्या निकालानुसार, एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. हे. जदयू पक्षाच्या स्थापनेपासूनची ही सर्वात खराब कामगिरी आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाणा साधत रोहित पवार म्हणाले, बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळले, अशी टीका त्यांनी केली.

यातून बोध घेऊन नितीश कुमार यांनी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.