येरवडा जेलमध्ये ‘सायबर’ कट? ८६ लाखांच्या फसवणुकीत दोघे अटकेत!

Rokhthok Maharashtra 46 0

येरवडा कारागृहात झालेली ओळख आणि बाहेर आल्यानंतर सायबर फसवणुकीचा कथित कट!
शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. तेजस लोखंडे आणि अविनाश बाकलीकर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात दोघांची ओळख झाली आणि तेथूनच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरविण्याचे नियोजन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या टोळीने आतापर्यंत आठ वेगवेगळी बँक खाती सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे. आणखी करंट अकाउंट उघडण्यासाठी दोन कंपन्यांच्या नावाने कार्यालयेही सुरू करण्यात आली होती.
या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.