पुणे

चंदननगर येथील तरुणावर खूनी हल्ला करणाऱ्या फरारी आरोपीस चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

चंदननगर येथील तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील इतर चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. बिडीकामगार वसाहत चंदननगर), सुफीयान जाकीर तांबोळी (वय २२ रा. केसनंद वाघोली), हुसेन अब्दुल शेख (वय २३ रा. बोराटेवस्ती चंदननगर), अनिकेत शिंदे (वय २७, रा. बोराटेवस्ती चंदननगर), शाहरूख चांद शेख (वय 27, रा. बिडीकामगार वसाहत) यांनी जागेच्या वादातून ओमकार भांडारी (रा. केसनंद) याच्यावर खुनी हल्ला केला होता. चंदननगर परिसरात गणपती मंदिराच्या मोकळया जागेच्या कारणावरून आरोपींनी तरुणावर धारदार हत्याराने वार करून जखमी करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चार आरोपींना तत्काळ अटक केली होती. परंतु त्यापैकी एक आरोपी शाहरूख चांद शेख (२७, रा. बिडीकामगार वसाहत) गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. दरम्यान, पोलीस अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे तपास करून आणि पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ व महेश नाणेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी श्रीगोंदा परीसरात शोध घेऊन त्यास घोगरगाव, ता. श्रीगोंद येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशिकात बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शिवा धांडे यांनी केली आहे.