पुणे

“निमित्त सावित्रीबाई फुले जयंतीचे अन मुलीच्या शिक्षणासाठी १२ हजारांचा धनादेश प्रदान… दिया फाउंडेशनच्या इम्रान शेखच्या उपक्रमाचे होतेय पुण्यात कौतुक”

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
भारतीय महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या भारतातील शिक्षणाची ज्ञानगंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती दिया फाउंडेशनच्या वतीने गंगा व्हिलेज येथे साजरी करण्यात आली. गाजावाजा न करता एका गरजू मुलीस शिक्षणासाठी दिया फाउंडेशनचे अध्यक्ष दयावान इम्रान भाई शेख यांनी 12 हजार रुपये मदत दिली.
सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षणासाठी अर्पण केले अन त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थिनीस शिक्षणासाठी मदत केल्याने खऱ्या अर्थाने जयंती दिया फाउंडेशेनने साजरी केल्याची चर्चा हडपसर परिसरात आहे.
सामाजिक सर्वधर्मियांसाठी सामाजिक उपक्रमाचे शतक अवघ्या एका वर्षात करणाऱ्या दयावान इम्रान शेखने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचीत्य साधून एका गरजू विद्यार्थीनीला डॉक्टर ऑफ मेडिसिन इन आयुर्वेद या कोर्स करिता धनादेश देऊन शिक्षणासाठी मदत केली खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले जयंती दिया फाउंडेशनने साजरी केली.

आम्ही अतिशय गरिबीमध्ये दिवस काढले, शाळा शिकताना सुविधा मिळाल्या नाहीत, परिस्थितीवर मात करून व्यवसायामध्ये जम बसविला ज्या अडचणी आपल्याला शिक्षणासाठी आल्या त्या इतर मुलींना येऊ नये म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन व अम्मी नसीम शेख यांच्या प्रेरणेने इतरांना शैक्षणिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो, आज या पवित्र दिनी एका मुलीस शिक्षणासाठी १२ हजारांचा धनादेश दिला भविष्यात गरजुंना मोठी शैक्षणिक मदत करणार आहे.
दयावान इम्रान शेख
अध्यक्ष – दिया फाउंडेशन