पुणे

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट – ०५ ची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर. हडपसर परिसरात वाहन चोरी करणा-यास अटक करून त्याचेकडुन एकुण २० मोटर सायकली केल्या जप्त.

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-५कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे १. अजय रमेशराव शेंडे, वय-३२ वर्षे, रा. मु. सहजपुर, म्हस्कोबा चौक, ता. दौंड, जि. पुणे याचा शोध घेऊन त्यास शिताफीने पकडुन त्याचेकडील बनावट नंबर प्लेटची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन, हडपसर पोलीस ठाणेकडील वाहन चोरीच्या गुन्हयात अटक केली आहे. त्याचेकडे कौशल्यपूर्वक तपास करता, आरोपी अजय शेंडे याने पुणे जिल्हा व इतरत्र ठिकाणाहुन मोटार सायकली चोरी केली होती. सदरची वाहने सोलापुर येथील त्याचा मित्र यल्लाप्पा बेळळे यास विक्री केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे युनिटकडील तपास टिम सोलापुर येथे जाऊन नमुद इसमाचा शोध घेऊन आरोपी २. यल्लाप्पा कृष्णात बेळळे, वय-३४ वर्षे, रा. मु. नंदुर, पो. डोणगाव, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर यासही अटक केली.

सदर आरोपीतांकडुन ९,९०,०००/- रु किच्या एकुण २० मोटार सायकली जप्त करून,जप्त केलेल्या मोटार सायकली चोरीबाबत पुणे शहर – ११, पिंपरी चिंचवड आयुक्तालय – ०१, पुणे ग्रामीण – ०१, बीड जिल्हा – ०३, सोलापुर -०१, उस्मानाबाद – ०२ व लातुर ०१ असे एकुण २० वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ते खालील प्रमाणे –

१) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १३९४ /२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ४११

२)हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १४०९/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९

३)हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १४१४ / २०२० भादवि ३७९

४) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ६२० / २०२१ भा.द.वि. कलम ३७९

(५) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३७० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

(६) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४२३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

७) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १३७८/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ ८) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३४५ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

९) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

१०) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३६० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ ११) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ११९६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

१२) भोसरी पो.स्टे. गु.र.नं. ६२ / २०२० भा.द.वि. कलम ३७९

१३) वडगाव निंबाळकर पो.स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. ३९१ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ १४ ) केज पो.स्टे. बीड, गुन्हा रजि. नं. ४६५ / २०२२, भादंवि कलम ३७९

१५) केज पो.स्टे. बिड गु.र.नं. ५१२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

१६) केज पो.स्टे. बिड गु.र.नं. ३४४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९

१७) विजापुरनाका पो.स्टे. सोलापुर शहर, गुन्हा रजि. नं. ५६० / २०२२ भादंवि ३७९

१८) आनंद नगर उस्मानाबाद पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १०९/२०२२ भादंवि कलम ३७९ १९) कळंब पो.स्टे. उस्मानाबाद, गु.र.नं. ३९५/२०२१, भादंवि ३७९ २०) मुरूड पो.स्टे. लातुर, गुन्हा रजि. नं. ०२ / २०२२, ०२/२०२२, भादंवि ३७९

नमुद अटक आरोपी अजय रमेशराव शेंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यवत पो. स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. ५९/२०२२, भा.दं.वि. कलम ३८०, ४०७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, रमेश साबळे, दया शेगर, शशिकांत नाळे, अमित कांबळे व पांडुरंग कांबळे यांनी केलेली आहे.