पुणे

प्रजासत्ताक दिना निमित्त आम आदमी पार्टीच्या, हडपसर, पुणे च्या वतीने आदर्श पत्रकार व आदर्श सेनानी सन्मान सोहळा

संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर, काळेपडळ पोलिस चौकी शेजारी, काळेपडळ येथे हडपसर भागातील आम आदमी पार्टीचे इच्छुक उमेदवार सचिन कोतवाल, दीलीप गायकवाड, अस्मिता मांढरे, अशोक हरपळे व अध्यक्ष शैलेश जाधव यांच्या वतीने
हडपसर, पुणे परिसरातील आदर्श पत्रकार व आदर्श सेनानी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कोतवाल यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि सूत्रसंचलन दिलीप गायकवाड यांनी केले.

उपस्थिती आदर्श पत्रकारांच्या वतीने राजू शिंगाडे, अशोक बालगुडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर व्यासपीठावरील मण्यावरांपैकी ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारद्वाज यांनी भाषणात पत्रकारांना पत्रकारिता कशी करावी व ती करत असताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर उपस्थित 5 आदर्श सेनानी व 50 पेक्षा जास्त आदर्श पत्रकार यांचा सन्मानचिन्ह व पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मुकेश वाडकर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये आम आदमी पक्षाचे पुणे शहर समन्वयक डॉ अभिजीत मोरे, सुजित अग्रवाल उपस्थित होते, त्यांनी पत्रकारां समोर आम आदमी पक्ष्याची भूमिका मांडली, याप्रसंगी प्रदिप गाडेकर, अॅड जायभाय, सौ राणीताई परांडे, अनिल मोरे , महेश टेळे, चंद्रशेखर भांगे, अशोक लंगडे, अशोक झेंडे, सतिश वलटे, अक्षय कोळपे, परशुराम घनवट व इतर अनेक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.