Uncategorizedपुणे

महीलेच्या पर्समधिल ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास, शिरूर एस, टी बस स्थानकातिल घटना, दोन चोरट्यांना पकडण्यात यश एक महिला साथीदार फरार… प्रतिनिधी- स्वप्नील कदम

शिरुर -गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत : असताना महिलेच्या पर्समधील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उन शिरूर एस.टी. बस स्टॅन्डवर शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नागरिकांनी सर्तकता दाखवून दोन चोरट्यांना पकडले आहे तर त्यांची महिला साथीदार फरार झाली आहे.

निकेश गफुर भोसले, काटया निकेष भोसले (वय २२ दोघे रा. पाण्याची टाकी शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांची महिला साथीदार इसरांत्या विजय काळे (रा. पाण्याची टाकी शिरूर ता. शिरूर जि. पुणे.) फरार झाली आहे. याप्रकरणी संगीता रामदास सुरासे (वय ४४ रा. इचलकरंजी लक्ष्मीनगर गल्ली नं. ३ ता. इचलकरंजी जि. कोल्हापुर) यांनी तिघांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता सुरासे व त्यांचे पती रामदास सुरासे हे शिरूरवरून पुण्याला चालले होते. शिरूर एस.टी. बस स्टॅन्डवर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे भिक मागण्याकरीता दोन लहान मुले पाठविले. त्यादरम्यान फिर्यादी बसमध्ये चढत असताना गर्दीत वरील तिघांनी संगणमत करून त्यांच्या हातातील पर्स जबरीने हिसकावुन पळून गेले.दरम्यान, आरोपी महिला इसरांत्या काळे या पर्स घेऊन पळून जात असताना, फिर्यादी संगिता सुरासे या पाठलाग करीत होत्या. तेव्हा आरोपी निकेश भोसले व काटया भोसले यांनी संगिता सुरासे यांना अडविले. त्यानंतर आरोपी महिला इसरांत्या काळे या पर्स घेऊन पळून गेला. मात्र नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून आरोपी निकेश भोसले, व काटया भोसले याला पकडले आहे. आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर महिला साथीदार इसरांत्या काळे फरार झाल्या आहेत.

याप्रकरणी संगीता सुरासे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तीन जणांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी निकेश भोसले व काटया भोसले याला अटक करण्यात आली आहे. तर आरोपी महिला इसरांत्या काळे फरार झाली आहेत. पोलीस आरोपी महिलेच्या मागावर आहेत.

पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत..