पुणेहडपसर

स्पंदन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

हडपसर,वार्ताहर.

दिपक वेल्फेअर फाऊंडेशन आयोजित स्पंदन सोशल स्पेशल स्कूल आणि पुनर्वसन केंद्र पुणे,विशेष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रेरणा प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ऑक्यूपेशन थेरपी, फिजिओथेरपी, आणि स्वीय थेरपी स्टेअप असे उपयुक्त शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

 

स्पंदन शाळेतील या विशेष विद्यार्थ्यांनी अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहकार्याने व कार्यक्षमतेच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करावे असे मत जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा.लि. चे विल संचालक शशांक भटनागर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी शशांक भटनागर,भारतीय बहुउदेशीय खादी व ग्रामोद्योग संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, राजर्षी
दत्ता, प्रशांत मोहिते,संतोष जगताप, राखी त्यागी,स्पंदन शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गाडेकर उपस्थित होते.

 

कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय राऊत यांनी केले तर आभार पांडूरंग गाडेकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे अधिकारी दत्तात्रय लोंढे, अमित खंडाळे, अक्षय राऊत, महेश नेवसे,अभिषेक बंड व शेखर मरकड यांनी अपार मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे सहकारी तसेच  शाळेतील शिक्षक व शाळेतील आजी- माजी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.