पुणे

किशोर भगवान तरवडे यांची जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

पुणे : भवानी पेठेतील जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा उद्योजक राजाभाऊ उर्फ किशोर भगवान तरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किशोर तरवडे हे रियल इस्टेट, हॉटेल आणि ट्रॅव्हल व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच हुंडेकरी असोशिएशनचे पुणे शहराध्यक्ष आहेत. व्यावसायिक क्षेत्रांबरोबरच किशोर तरवडे यांनी सामाजिक क्षेत्रातही सातत्याने भरीव योगदान  दिले आहे. या बिनविरोध निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर भगवान तरवडे यांचे अभिनंदन केले आहे.