पुणे

इच्छाशक्ती व्यासपीठा तर्फे कर्तुत्वान महिलांचा सन्मान

आंबेगाव दत्तनगर येथील इच्छाशक्ती व्यासपीठाच्या वतीने परीसरातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यावसायिक महिलांच्या वस्तूंचे , फुडचे विक्री स्टॉल्स आणि ब्रायडल मेकअप, ब्रायडल मेहंदी , रांगोळी , पाककला , रॅम्प वॉक , थीम उखाणे , ऑल मॅचिंग , लकी ड्रॉ , प्रश्नोत्तरे स्पर्धा अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.*

महिला नी आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे. समाजातील महिलांना व्यासपीठाच्या वतीने रोजगार निर्मितीचे धडे देणें अवश्य असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन. इच्छाशक्ती व्यासपीठाच्या संस्थापक अध्यक्षा किशोरी गोरक्ष सांगळे यांनी केले आहे.

 

कर्तृत्वान महिलांचा सन्मान आणि बक्षीस वितरण या वेळी . वैशाली पाटील, डॉ. शीतल कल्याने , डॉ. अंकिता धोका , गौरी जाधव , गीतांजली जाधव , पल्लवी प्रसाद जगताप , प्राजक्ता श्रीकांत लिपाणे* उपस्थित होत्या *विशेष सहकार्य केलेल्या सहकार्याबद्दल मीनाक्षीस् नाईटीस् संचालिका मीनाक्षी ओझा , इच्छाशक्ती व्यासपीठ ग्रूप सभासद , श्रीखंड कंपनीचे संचालक सुशील पटेल , दंताले ज्वेलर्स आणि वॉच कंपनी संचालक क्षितिज पटेल आणि ओरा हॉस्पिटल टीम सहकारी मैत्रिणी, फॅमिली मेंबर्सचे आभार इच्छाशक्ती. व्यासपीठाच्या किश़ोरी सांगळे यांनी आभार मानले.