पुणे

“सराईत वाहन चोराच्या मुंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या – : तपासात ५ गुन्ह्यांची उकल : विधी संघर्षित साथादारही ताब्यात”

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मुंढवा पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी करत सराईत वाहन चोर व त्याच्या विधी संघर्षित साथिदाराकडून तीन वाहने व जबरी चोरीचे दोन किमती मोबाईल जप्त केले आहेत. यावेळी मुंढवा, हडपसर व चंदननगर येथील ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि . १४ एप्रिल रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक लकडे व क्राईम पोलीस निरीक्षक काकडे, मुंढवा पो.स्टे. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सपोनि संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशन, हदीमधील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना आरोपी सुरज संजय सोनोने, वय २० वर्षे, रा. वाचमन रुम, यमुना बिल्डींग, गुरुकृपा सोसायटी, ऑर्बिस स्कुल समोर, केशवनगर, मुंढवा, पुणे मुळ रा. मु. गायगाव, पो. चिंचोली कारफार्म, ता. शेगाव, जि. बुलढाणा व त्याचा अल्पवयीन साथीदार यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांचे ताब्यात असलेली दुचाकी बाबत तपास केला असता, ती गुन्हा रजि नं १३० / २३ भादवी ३७९ मधील चोरी झालेली मोटर सायकल असल्याचे उघडकीस आले.

आरोपीकडे अधिक तपास केला असता तपासामध्ये सदर आरोपी व वि.सं. बालक यांनी मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन मोटर सायकल, एक मोबाईल, चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नदीपात्र रस्ता, नुरी मश्जिदचे गेट समोर, खाराडी पुणे येथे कारची काच फोडून किंमती मोबईलची व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोपेड वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर मोटर सायकल व किंमती मोबाईल आरोपीकडुन जप्त करण्यात आले असुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. उघड करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहीती खालीलप्रमाणे आहे.

१) मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. १२९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ २) मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. १३०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
३) मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. ३१३ / २०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४
४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ३५२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
५) चंदननगर पो स्टे गुर नं १५७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ ४२७ ३४
सदरची कामगीरी रीतेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णीक, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ ५ पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे प्रदिप काकडे पोलीस निरीक्षक (गुन्हे). मुंढवा तपास पथकाचे अधिकारी संदिप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक, व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.