पुणे

तुकाईदर्शन तुकाई टेकडी येथिल श्री स्वामी समर्थ मंदिरात दावत-ए-इफ्तार

तुकाईदर्शन तुकाई टेकडी येथिल श्री स्वामी समर्थ मंदिरात दावत-ए-इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रमजान महिन्यातील २८ वा रोजा ७ वाजुन ५१ मिनीटांनी मुस्लिम बांधवानी स्वामी समर्थ मंदिरात सोडला.यानंतर ७.३० वा.मुस्लिम बांधवानी स्वामींची महाआरतीही केली.कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ होले ,शादाब मुलाणी यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विकास रासकर,मा.नगरसेवक मारुती तुपे,संजय शिंदे आदि उपस्थित होते. अझीझ सय्यद,अहमद खान,गुलाब सय्यद,मुस्तफा शेख,रियाज सय्यद,लाला सय्यद,साबिर शेख,आबुलहासन सय्यद,सलीम मुलाणी,मुस्ताक शेख यासह प्रविण होले,भुषण चव्हाण,मोरेश्वर कुलकर्णी,पांडुरंग शेंडे,दिलीप भामे,चंद्रकांत वाघमारे,तुकाराम घोडके,प्रसाद होले,आदित्य साबळे,ओम राऊत,गणेश सातव,शैलेश काळभोर आदिसह अनेक स्वामी भक्त उपस्थित होते.

 

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक राजाभाऊ होले म्हणाले मुस्लिम बांधवानी मंदिरात रोजा सोडल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे,याकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून बघितले जाईल.आम्ही सुधारणावादी प्रवृत्ती समाजात घडवु इच्छितो म्हणुनच यावर्षी समाजात प्रथमच स्वामींच्या प्रकटदिना निमीत्त या मंदिरातील पादुकांच्या पालखीला महिलांनीच खांदा दिला.