पुणे

“माटोबा विद्यालय नाथाचीवाडी येथे तब्ब्ल २१ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग… सण २००२ च्या १० विच्या विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावा

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

यवत -माटोबा विद्यालय नाथाचिवाडी(ता.दौंड) च्या सण २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाचा तब्ब्ल २१ वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा मेहेर रिट्रीट खुटबाव याठिकाणी (दि.१९)रोजी पार पडला. सर्वप्रथम राष्ट्रगीताने वर्गाची सुरवात झाली. प्रार्थना म्हणत परिपाठ घेण्यात आला, त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यान्ची हजेरी घेण्यात आली.
एकवीस वर्षांनी विद्यार्थी भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला त्यानंतर सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विष्णूदास दरेकर म्हणाले की खरे तर आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे विशेष म्हणजे आमच्या बरोबर उपस्थितामध्ये आमचे काही माजी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत अनेक दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद आहे.सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्ह्यावा असे वाटते.

त्यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थी वृषाली खंडाळे हिने चंद्रा गाण्यावरील लावणी सादर करत शाळेत १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला अग्रक्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेत असणाऱ्या विद्यार्थिनीचे विष्णुदास दरेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी गुरूंकडून सत्कार सत्कार होणं म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोलाचा क्षण असल्याचे वृषाली खंडाळे यांनी सांगितले.
शाळेचे दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली,सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विष्णुदास दरेकर सर,मेमाणे सर,हाके सर,शिंपणकर सर,काकडे मॅडम व कार्यक्रमाचे नियोजन विजय दोरगे,अंकुश हाके, निर्मला लडकत -लोंढे, अर्चना शितोळे – कोंडे, नितीन धायगुडे यांनी केले होते.
त्यानंतर संयोजक आणि सूत्रसंचालन करणारे संदीप गडदे,कविता शिंदे, अंकुश हाके यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले.यावेळी स्नेहा इनामके, मोनाली पवार,पुनम नातू, पल्लवी होले, गणेश हाके,भाऊ गायकवाड, संदीप आवाळे,श्रीकांत थोरात,स्वाती रासकर,स्वाती मोरे,धनंजय शितोळे, मुकुंद रायकर,महेश दोरगे,राणी रासकर,प्रशांत ढवळे,अविनाश म्हेत्रे,शोभा वळकुंडे,काळूराम बर्वे सर्व विदयार्थी उपस्थित होते.सर्वानी पसायदान म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.