पुणे

कर्तव्यावर असणाऱ्या लोणीकाळभोर वाहतूक पोलीसाने होर्डिंग लावत असताना वीजेचा करंट लागलेल्या तरुणाचे वाचवले प्राण…!

पुणे:प्रतिनिधी: ( रमेश निकाळजे )

पुणे सोलापूर रोडच्या कडेला असणाऱ्या होर्डिंग वर फ्लेक्स लावत असताना लोणीकाळभोर टोलनाका येथे एका व्यक्तीला करंट लागून तो होर्डिंग वरच अडकला आहे असे कळताच टोल नाका येथे कर्तव्यावर असणारे पुणे शहर वाहतुक पोलीस कर्मचारी ज्ञानोबा बढे ( बक्कल नंबर 380 ) यांनी जीवाची पर्वा न करता स्वतः त्या बोर्ड वर चढून 25 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला
त्यामुळे सर्व स्तरातून पोलीस ज्ञानोबा बडे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

बडे यांना स्थानीक् व्यक्तिकडून समजले की एक मुलगा होर्डिंग वर चढला आहे व त्याला खाली उतरता येत नाही, तेंव्हा बडे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्या मुलाला करंट बसल्यामुळे त्याला खाली उतरता येत नसल्याचे लक्षात आले, बडे यांनी प्रसंगावधानाने तेथील लाईट चा सप्लाय बंद केला व होर्डिंग वर चडून त्या मुलाला ताबडतोप खाली घेतले व दवाखान्यात घेऊन गेले .

बडे यांनी जीवाची पर्वा न करता करंट चालू असताना सुद्धा बोर्डवर चढून एका कामगाराचे प्राण वाचवले त्यामुळे श्री ज्ञानोबा बढे वय वर्ष 52 यांनी अतिशय कठीण परिस्थितीत धाडस करून एका तरुणाचे प्राण वाचवल्यामुळे स्थानिक नागरिक तसेंच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे.