पुणे

किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघाचा सातवा कौटुंबिक मेळावा

पुणे (प्रतिनिधी )
कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या नंतर सुध्दा एकमेकांच्या बद्दलचा स्नेहभाव आजून जपणे हा समाजापुढे एक आदर्शच आहे असे प्रतिपादन किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीचे मानव संसाधन(एच.आर.) अधिकारी गणेश चौधरी यांनी केले.

किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघाचा सातवा कौटुंबिक मेळावा महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता, प्रसंगी चौधरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गणेश चौधरी सह इगतपुरे, श्रीशैल जकुने, चंद्रकांत माढंरे, नवनाथ झांजुर्णे, महादेव धर्मे, सुरेश भोसले आदींसह सत्कार मुर्ती उपस्थित होते.

सर्व आयोजकांनी घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे व परिश्रम यामुळे कालचा आठवा स्नेहमेळावा उत्साहात यशस्वीपणे पार पडला असल्याचे मत इगतपुरे यांनी व्यक्त केले.
आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हा कौटुंबिक मेळावा संपन्न झाला आहे असे मनोगत व्यक्त करताना श्रीशैल जकुणे म्हणाले.

आपल्या या अथक परिश्रमाने या मेळाव्यात सर्व कुटुंबीयांचा आनंद व्दिगुणित झाला असल्याचे सर्व जेष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले.

या मेळाव्यात जितेंद्र भुरुक प्रस्तुत गाण्यांचा “गीतोंका सफर” हा बहारदार आनंद स्वयंस्फूर्तीने नाचत गात सर्वांनी घेतला. यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद सर्व कुटुंबीयांनी घेतला.
सुधीर मेथेकर