पुणे

मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर छापा, एक लाख रुपयांसह ३५ जणांना घेतले ताब्यात…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे शहरातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा भागातील पत्र्याच्या शेडम ध्ये सुरू असणा-या जुगाराच्या अड्डयावर छापा मारून कारवाई केली, पोलिसांनी येथून ३४ जणांना पकडले आहे,पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ३४ जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.

ताब्यात असणाऱ्या ३४ जनांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र झूगार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,हि कारवाई अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे,सामाजिकचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राणे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.