पुणे

ड्रेस कोड का व कशासाठी ? घ्या जाणून या गोष्टीचे पारंपरिक महत्व”

सध्या सगळीकडे मंदिरात प्रवेश करताना ड्रेस अर्थात कुठले कपडे परिधान केलेले असावेत यावर तर्कवितर्क, उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याचे कारण मंदिरात प्रवेश करताना काही स्त्री-पुरुष आपल्याला आवडतील ते कपडे परिधान करून येतात ! काही वेळा हिंदू संस्कृतीला अमान्य असे तोकडे कपडे सुध्दा ही मंडळी परिधान करून येतात हे योग्य नाही असे काही धार्मिक कार्य करणाऱ्या मंडळींना वाटते तर काही आधुनिकीकरण करणाऱ्यांना काही मंडळींना यात गैर काय असे वाटते.
https://www.youtube.com/watch?v=Sv92bRbltZ4
आपण या संदर्भात थोडासा विचार केला तर आपल्याला माहिती लक्षात येईल की प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम शाळेतील ड्रेस कुठला आहे ते सांगितले जाते व तो तुम्हाला परिधान करणे सक्तीचे असते, हाच प्रकार सध्या विविध महाविद्यालयात सुध्दा आहे. थोडक्यात शैक्षणिक क्षेत्रात ड्रेस कोड ठरलेला असतोच. हे कशासाठी तर शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी एकसारखे (युनिक) दिसावे व एक शिस्त म्हणून असायला हवे. दुसरे कारण गरीब-श्रीमंत हा भेद मुलांच्या मनात येऊ नये ! नाही तर श्रीमंतांची मुलं विविध रंगीत व “भारीचे”कपडे परिधान करून येतील तर परिस्थितीने गरीब मुलांना तसे कपडे घालून येणे शक्य नाही. कपड्यांवरुन भेदभाव नसावा हा पण एक उद्देश असावा !
https://www.youtube.com/watch?v=klJ3HvpSKhw
शहरात विविध शासकीय, निमशासकीय, विविध कंपन्या यांची  कार्यालय आहेत. तेथेही एकसारखे पणा असावा म्हणून ड्रेसकोड ठरलेला असतो. एसटी चालक व वाहक, रिक्षाचालक, काही शासकीय, निमशासकीय, खाजगी कारखान्या मधील ड्रायव्हर(चालक) यांनीही ड्रेसकोड ठरलेला असतो तसा डॉक्टर, वकील यांचेही ड्रेस सर्व मान्य असतात, विविध धर्मात सुध्दा विशिष्ट पेहराव करण्यासाठी सांगितले जाते व त्या पध्दतीने ती मंडळी याचा आदर करतात !
असं असताना मंदिरात प्रवेश करताना कपडे परिधान करण्यासंदर्भात काही नियम व अटी लागु केल्यातर बिघडले कुठे ? ईतर ठिकाणी तुम्ही कुठलेही कपडे घातले तर त्याला कोणी विरोध करणार नाही. आपण स्वछंदी पणे कुठलेही कपडे परिधान केले तरी कोणालाही गैर वाटणार नाही, परंतु जेथे गरजेचे आहे तेथे नियमावली असायला काहीही हरकत नसावी. 
https://www.youtube.com/watch?v=ZTrO7HqOyWQ&t=57s
आपण मंदिरात जातो ते आपल्या मानसिक समाधानासाठी. येथे शांतता भंग होईल असे काहीही व्हायला नको म्हणून जर नियम केले तर यथायोग्य आहेत. स्त्री असो की पुरुष मंदिरात जाताना आपण योग्य कपडे घालून जायला हवं जेणेकरून कुणाच्या भावना दुखावणार नाहीत व एक शिस्त पाळल्याने इतरांना समाधान मिळेल. मला वाटते तसे कपडे घालून मी मंदिरात जाणार असा अट्टाहास कोणी करू नये असे आम्हाला वाटते. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनीच यत्न करायला हवेत.
सुधीर मेथेकर,
अध्यक्ष-हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे
https://www.youtube.com/watch?v=8PgxtucbYbA