पुणेहडपसर

हडपसरच्या सामाजिक संस्थांच्या सेवेने हजारो वारकरी सुखावले – भक्तीपूर्ण वातावरणात पालखी रवाना”

हडपसर मध्ये सामाजिक संघटनाकडून पालखीचे स्वागत

हडपसर मध्ये नेत्रदीपक पालखी सोहळा पार पडला, माऊली ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
हडपसर मधील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला.
शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपशहर प्रमुख संतोष रजपूत यांनी पालखीच्या स्वागत कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

धनगर समाज युवक संघ व मावळा ग्रुपच्या वतीने घनश्याम बापू हाक्के, रेश्मा हक्के यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करून वारकऱ्यांना सेवा दिली.
शहीद भगतसिंग ट्रस्टच्या वतीने बच्चू सिंग टाक, आझादसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली थकलेल्या दमलेल्या वारकऱ्यांची मसाज करून सेवा करण्यात आली तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.

 

खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वारीत सहभागी झाले होते.
मांजरी फाटा चौकात दिलीप शंकर तुपे, विशाल तुपे, सचिन मोरे, सचिन तांबे, बाबा थिटे आनंद सुर्यवंशी,सुमित तापकीर,अमोल मारणे,प्रशांत गायकवाड, अशोक बापू शिंगोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

गजानन मित्र मंडळाच्या वतीने सतीश जगताप, अभिजित कदम यांनी वारकऱ्यांसाठी खिचडी, तसेच निरंकारी मंडळाच्या वतीने ही वारकऱ्यांची सेवा करण्यात आली, अमर समृद्धी सोसायटीच्या वतीने चेअरमन स्वप्निल धर्मे व प्रतापराव पवार, आणि सोसायटीच्या संचालक सदस्यांनी वारकऱ्यांना पानाच्या बाटल्यांची वाटप केले. उद्योजक राहुल आबा तुपे, प्रमोद आबा तुपे, अमर तुपे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष नियोजन केले होते.

 

हडपसर मध्ये दोन्ही पालखी आल्याने वारकरी व नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले, सुखद सोहळा सर्वांनी अनुभवला. राज्यात पाऊस व्हावा सर्व सुखा समाधानाचे दिवस यावेत ही पांडुरंगाचे चरणी प्रार्थना आहे असे मत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केले.हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोपले यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पालख्या साठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे चोरांवर अंकुश बसविण्यात यश आले.