पुणे ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये 15 वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक (बोधचिन्ह) हडपसर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब पवार यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले आहे. पवार यांना पोलीस महासंचालक पदक मिळाले, त्याबद्दल अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त पोलीस महासंचालकांकडून सेवा अभिलेख उत्तम ठेवणे, उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत दरवर्षी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून पदक देऊन सन्मानित करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे एक मे रोजीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. ज्यांना पदके जाहीर केली आहेत, त्यांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, वानवडी पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब करचे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
