गडचिरोली

खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना चेकचे वाटप प्रतिनिधीक स्वरूपात कार्यक्रम संपन्न! – शेतकऱ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी युती सरकार कटिबद्ध- खासदार अशोक नेते

सिरोंचा:- मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सिरोंचा तहसील कार्यालय सभागृहात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधीक स्वरुपात काही शेतकर्यांना चेक वाटप करण्यात आले या सभेच्या व्यासपीठावर विधानपरिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,भाजपा जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, सत्यनारायण मंचालवार, दामोधर अरिगेला, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, राजू पेददापलि (माजी नगराध्यक्ष),जि.उपाध्यक्ष अनिल पोहणकर, अहेरी भाजपा तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री,आदी मंचकावर विराजमान होते यावेळी मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकर्यांना प्रतिनिधीक स्वरुपात काही मोजक्या शेतकऱ्यांना खा. अशोक नेते,आ.रामदास आंबटकर यांचा हस्ते चेक वाटप करण्यात आले. इतर सर्व शेतकर्यांचे त्यांचा बँक खात्यात रक्कम जमा वळती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना खा.अशोक नेते म्हणाले
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे सरकार हे सर्वसामान्य चे हित जोपासणारे,दाद देणारे, प्रश्न सोडविणारे सरकार आहे. मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकरी काय होईल काय नाही या विवंचनेत होते. पंधरा वीस दिवसापूर्वी मी शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, जाणून घेतल्या ते निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले तेलंगणा चा अधिकारी व पालकमंत्री यांच्याशी याबाबत संवाद साधला मेडिगट्टा प्रकल्प हा आपल्या राज्याचा नसून तेलंगणा राज्यांतर्गत येतो पण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसतो आहे राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोली आले असता तेव्हा ही हा विषय लावून धरलो अकरा कोटी तेलंगणा सरकारने दिलेले व सव्वीस कोटी राज्य सरकारने दिलेले असे सदतीस कोटी रूपये मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे आज प्रतिनिधीक स्वरुपात मोजके शेतकरयांना चेक वाटप करण्यात येत आहे बाकी लोकांना बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव वर्ष पूर्ण होत असल्याने नव वर्षाच्या सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची उहापोह करण्यात आली.

 

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना वि.प. आ.आंबटकर म्हणाले केंद्र व राज्य हे युतीचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मीही विधानपरिषदेत उचलून धरला होता सरकार ने सकारात्मक पवित्रा घेत आज तडीस नेला आज शेतकर्यांना मोबदला मिळत आहे. नरेंद्र मोदी सरकारची नव वर्षाच्या काळात सर्व सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्नातून विविध योजना राबविल्या चे सांगितले.

 

यावेळी चेक वाटप करण्यात आलेल्या शेतकरयाची नांवे (१)भाविकराव प्रतापराव शिबाडी यांचे नांवें पांच चेक होते (२) प्रतापराव माधवराव शिबाडी (३)मोहन रामया रिककूला (४)भूमकका लचछया गुडा रा.आरडा(५) गंगा जमुना प्रभाकररेडडी मुस्कूला रा आरडा (६) प्रभाकररेडडी बककारेडडी मुस्कूला रा ‌आरडा (७) श्रीनिवास लक्ष्मीनारायण रंगूवार रा.आरडा (८) रामप्रसाद शंकर रंगुवार रा.आरडा (९) नरेंद्र लक्ष्मीनारायण रंगूवार रा आरडा यावेळी भाजपा सिरोंचा शहर अध्यक्ष सितापती गट्टू, माधव कासरलावार,सतिश पडमटीटी,कलाम हुसेन,रमेश मुंगीवार सह पदाधिकारी, कार्यकर्ते,प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.