गडचिरोली

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा नेतृत्वाखाली जाफराबाद आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर भाजपाचा एकतर्फी विजय..!!

सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद टेकडा या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक काल पार पडली असून भाजपा पक्षाचे रामचंद्रम लस्मय्या सडमेक अध्यक्ष व मधुकर नारायण नीलम उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत आणि निवडून आलेल्या संचालक मंडळाची सदस्य – राजेशम मल्लय्या कासेट्टी, पोचांना रामय्या आरे, नरसय्या बनाय्या पोरतेट, वेंकटी लासमया गावडे, पोचम पोट्टी अत्राम आदींची समावेश आहे.

जाफराबाद येथील संचालक मंडळांना निवडून आणण्यासाठी भाजपचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर पेद्दी, बापू सडमेक माजी सरपंच, श्रीनिवास ओल्लाला, पोलंपल्ली रजबापू , संतोष अंबिलापू, सदानंदम चींतावर , शंकराय्या मंचाला, कुकमेस्वर सोदरी, महांकली कोटा, महेश दुर्गम आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले..!!