पुणेमहाराष्ट्र

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी सेनेचे प्रवेश

पुणे (प्रतिनिधी )

युवा योद्धा जागा हो..! मनविसेचा धागा हो..!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हडपसर भागातील विविध काॅलेज एस.एम.जोशी, सिंहगड काॅलेज व के.जे कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. कॉलेज युनिट व विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवां असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.

 

यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसे राज्य संघटक प्रशांत कनोजिया, मनविसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील, मनविसे पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, मनसे विभाग अध्यक्ष अमोल शिरस, शहर सचिव प्रतिक वाघे, मनविसे पुणे शहरसंघटक महेश भोईभार, मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार, मनविसे विभाग सचिव रोनक बाबर व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.