पुणे

“मुख्यमंत्र्यानी दिलेला शब्द पाळला…. कोट्यावधी निधी मंजूर… महंमदवाडीत होणार 122 कोटींचे प्रशस्त रस्ते….

हडपसर (प्रतिनिधी)
मंमदवाडी परिसरासाठी निधी देऊ असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता याबाबत पाठपुरावा केल्यानंतर निधी उपलब्ध करून दिल्याने मंमदवाडीतील परिसरात 122 कोटींचे डीपी रस्ते निर्माण होणार आहेत अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होत असल्याचेही भानगिरे यांनी आवर्जून सांगितले.

या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या मध्ये लक्ष दिल्याने निधी मिळण्यास गती मिळाली मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनासोबत सातत्याने संवाद साधून निधीची तरतूद करून दिली यामध्ये महंमदवाडी परिसरात रस्ते होणार आहेत, सर्वे नंबर 1, 2, 3, 4, 96, 59, 58 मधून जाणारा 24 मीटर डीपी रस्ता विकसित करणे सर्वे नंबर 40 ते सर्वे नंबर 76 मधून जाणारा 30 मीटर डीपी रस्त्यालगत 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे, महंमदवाडी ते रामटेकडी औद्योगिक वसाहत पर्यंत रास्ता विकसित करणे या कामी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कामही युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. आपल्या भागात होणारी कामे दर्जेदार करण्यासाठी संबंधितांना तशा सूचना केल्या जातील नागरिकांनीही या कामे सूचना करावीत असे आवाहन प्रमोद नाना भानगिरे यांनी केले आहे.

 

महंमदवाडी परिसरात शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची मागणी होती की वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी डीपी रस्ते तयार करावेत मात्र यासाठी निधीची तरतूद होत नव्हती त्यामुळे आम्ही प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून निधीची तरतूद करून घेतली, त्यानुसार आता कामाचा शुभारंभ झाला आहे, डीपी रस्ते झाल्याने वाहतुकीची कोंडी सूटण्यास मोठी मदत होईल.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख
शिवसेना पुणे शहर