पुणे

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी सुनील लोणकर तर उपाध्यक्ष पदी रमेश निकाळजे यांची निवड…!

पुणे : मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाची मार्च २०२४ रोजी मुदत संपली होती. त्यामुळे मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, महाराष्ट्र अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव गणेश मोकाशी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील संघाच्या सदस्यांची बैठक घेऊन पुणे जिल्हा पत्रकार संघाची निवड ही मतदान पद्धतीने घ्यायची की बिनविरोध पद्धतीने घ्यायची अशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडणुक घ्यावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २१ मे रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये सर्व इच्छुकांचे फॉर्म भरून घेण्यात आले. व त्याचा निकाल ३ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यात पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांची तर उपाध्यक्ष पदी रमेश निकाळजे यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच महिला अध्यक्ष पदी श्रावणी कामत यांची तर उपाध्यक्ष पदी सुनीता कसबे यांची निवड करण्यात आली.

 

बारामती) ७ तालुके जिल्हा संघटक – अनिल वडघुले (जबाबदारी शिरुर, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ ६ तालुके)

जिल्हा संघटक : चिराग फुलसुंदर (पिंपरी चिंचवड + पुणे शहर परिसर)

 

उपाध्यक्ष (जबाबदारी) –

१) सचिन कांकरीया (जुन्नर-आंबेगाव) २) मदन काळे (शिरूर-दौंड, खेड),

३) हनुमंत देवकर (चाकण मावळ), ४) चिंतामणी क्षिरसागर (बारामती-इंदापूर), ५) रमेश निकाळजे (हवेली, पुरंदर) ६) संतोष म्हस्के (भोर वेल्हा, मुळशी)

सरचिटणीस : सतिश सांगळे (इंदापूर) सहचिटणीस किरण दिघे (भोर महामार्ग) कोषाध्यक्ष : प्रा. संतोष काळे (दौंड) सहकोषाध्यक्ष संजय शेटे (खेड) कार्यालयीन चिटणीस-जीवन शेंडकर (दौंड)

जिल्हा समन्वयक : मारुती बाणेवार (मुळशी), रविंद्र वाळके (आंबेगाव) प्रवक्ता : सावता झोडगे (आंबेगाव) प्रसिद्धी प्रमु