पुणे

“हडपसर – फुरसुंगी मध्ये कोयता गँगचा उन्माद, वाहने आणि दुकानाची तोडफोड करून दशहत, हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे, दि. २ ः फुरसुंगी (ता. हवेली) येथे दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक करून तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले (वय २२, रा. संजुदा कॉम्प्लेक्स, पापडेवस्ती, फुरसुंगी) आणि माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या (वय १९, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत (वय २६, रा. शिवसेना भवनजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे भेकराईनगर येथे शंभू फॉरमेन्स दुकान आहे. दुकानासमोर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्राने दुकानाच्या काचा फोडल्या, दुकानासमोरून जाणार्या बसची काच फोडून, ढमाळवाडी येथील ७-८ वाहनांचे नुकसान केले होते. आरोपींचा तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षिका (गुन्हे) मंगल मोढवे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.