पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी शादाब खान यांची नियुक्ती

हडपसर (प्रतिनिधी) : हडपसर रामटेकडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक शादाब खान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कोंढवा येथील कार्यक्रमात शादाब खान यांनी आपल्या समर्थकांसह खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला होता.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, खा. सुप्रियाताई सुळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांच्या आदेशानुसार पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी पुणे शहर सरचिटणीस पदी शादाब खान यांची निवड केल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगीतले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शादाब खान यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आश्वासक आणि विश्वासदायक एकच पक्ष आणि चेहरा दिसतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि आदरणीय शरद पवार साहेब हेच आहेत. मी त्यांच्या विचारधारेत, नेतृत्वात समाजपयोगी आणि लोकपयोगी कार्य करण्याचा संकल्प करून राजकीयदृष्ट्या नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील. शासनाच्या योजना समाजातील वंचिताना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार.
शादाब खान
सरचिटणीस – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष