पुणे

पुणे शहर चिटणीसपदी अनिल सागरे तर संघटकपदी सचिन झगडे यांची नियुक्ती

हडपसर (प्रतिनिधी) : शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचारांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध असणारे हडपसर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अनिल सागरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर चिटणीसपदी तर सातववाडी येथील सचिन झगडे पुणे शहर संघटकपदी नियुक्त करण्यात आले. नियुक्तीचे पत्र शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा. खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, मा. खा. सुप्रियाताई सुळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंतराव पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांच्या आदेशानुसार पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी पुणे शहर चिटणीस आणि संघटक पदांची निवड केल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगीतले. सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्ज्वल करावी असा विश्वास व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अनिल सागरे म्हणाले की, अनेक वर्षापासून विविध सामाजिक प्रश्न संदर्भात सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय काम करत आहे. सर्व सामान्य नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शहरी अन् ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहत सामाजिक काम केले. सामाजिक कामांना काही मर्यादा आहेत. त्याला राजकीय पाठबळ मिळालं तर त्याची व्यापकता अजून मोठ्या प्रमाणात वाढून नागरिकांना न्याय देण्याचे काम घडू शकते. सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आश्वासक आणि विश्वासदायक एकच पक्ष आणि चेहरा दिसतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि आदरणीय शरद पवार साहेब हेच आहेत. मी त्यांच्या विचारधारेत, नेतृत्वात समाजपयोगी आणि लोकपयोगी कार्य करण्याचा संकल्प करून राजकीयदृष्ट्या नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील. अनिल सागरे यांची चिटणीसपदी निवड झाल्याने हडपसर व परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.