हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
योगासन व ध्यानधारणा यामुळे मानसिक विकास होतो, व ताणतणाव दूर होतात, आजची पिढी मोबाईल च्या प्रचंड आहारी गेली असून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी योगाचा वापर करावा असे आवाहन योग शिक्षक हरिशचंद्र टेमगिरे यांनी केले.
रूपा फाऊंडेशन अणि सॉकर पीच यांच्या संयुक्त विद्यमाने
खराडी येथील सनराईस इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांन साठी योगासने अणि प्राणायाम अभ्यास वर्ग घेण्यात आला.
Yoga Bliss या संस्थेचे हरीशचंद्र टेमगिरे व अमित काटकोरिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रूपा फाऊंडेशन चे सागर भंडारी व सॉकर पिच फूटबॉल अकॅडेमी चे ओंकार साबळे यांनी खेळ अणि योगासन याबद्दल शाळेतील मुलांना माहिती दिली.
आज मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी व त्यांच्या शारीरिक व मानसिकता निरामय आयुष्यासाठी दररोज शालेय शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून योग कसा करावा हे करून दाखविले व विद्यार्थी कडून करून घेतले.
सर्व विद्यार्थी अत्यंत आनंद होते.
यावेळी उपमुख्याध्यापिका देवयानी पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दररोज योग करण्याचे आवाहन केले.
पहा व्हिडीओ
https://www.facebook.com/270875513728685/posts/381577252658510/
