राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, व जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांना 22 वर्ष विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिंगापूर मध्ये ९ वे शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना व मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते,
यावेळी आयोजक शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार,
शब्द परिवाराचे उपाध्यक्ष शशी डंबारे, मुंबई हायकोर्टाचे एडवोकेट सतीश बोलूरकर, प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत, आदि यावेळी उपस्थित होते.
जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांना सिंगापूर मध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये सन्मान,
