पुणे

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील संघर्षाला यश,PMPML मधील १६७२ कर्मचाऱ्यांना अखेर कायम नियुक्ती..!! पीएमपीएमएल प्रशासनाकडून कायम नियुक्तीचा आदेश अखेर आज जारी

पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे महानगर परिवहन महामंडळातील (PMPML) कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, १६७२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून आज अधिकृतपणे कायम सेवेत सामावून घेण्यात आले आहे. हा निर्णय म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांच्या भविष्याला स्थैर्य देणारा आदेश असून तर एक सातत्यपूर्ण आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला

या ऐतिहासिक निर्णयामागे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनाचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. गेल्या काही वर्षांपासून PMPML मध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ना सेवासुरक्षा होती, ना भविष्याची हमी. काम असूनही नोकरीचे कोणतेही निश्चितत्व नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक अस्थिरतेचे सावट होते. शिवसेनेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत, आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आणि अखेर हे यश मिळाले

PMPML मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कंत्राटी स्वरूपातील रोजगार हे त्यांच्या शारीरिक श्रमाला स्थायित्व न देता कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय गेली अनेक वर्ष झाला नव्हता, याविरुद्ध सत्तेत असूनही शिवसेनेने वेळोवेळी PMPML प्रशासकीय यंत्रणेशी पत्रव्यवहार, भेटीगाठी, आंदोलने आणि निदर्शने, डेपो बंद यांचे माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली PMPML च्या मुख्य कार्यालयासमोर अनेकदा निदर्शने, अनेक डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आंदोलन करत आपल्या हक्कासाठी लढा उभारला. सत्ताधारी असतानाही शिवसेनेने कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी केलेले आंदोलन यामुळे पीएमपीएल प्रशासनाने अखेर सर्व 1672 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले याचे ज्वलंत उदाहरण ठरले.

PMPML प्रशासनाकडून आज अधिकृतपणे १६७२ कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा आदेश निर्गमित झाला. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील असंख्य जिवांना स्थैर्याचा नवा श्वास लाभला आहे. त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंतच्या मूलभूत गरजांची पूर्तता आता अधिक सुलभ होणार आहे.शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले नव्हते, 240 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय होत नव्हता त्यामुळे हा विजय केवळ या कर्मचाऱ्यांचा नाही, तर सर्वसामान्य श्रमिकवर्गाचा आहे. शिवसेना हा कृती करणारा पक्ष असून, आम्ही श्रमिकांच्या पाठीशी सदैव उभे राहू.

त्यांनी यावेळी शिवसेना PMPML कामगार संघटनेचे विशेष उल्लेख करत, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा लढा केवळ संघटनेपुरता मर्यादित ठेवता न आणता, तो एक सामाजिक चळवळ बनवला, असे नमूद केले.या निर्णयाने एक मोठा सामाजिक आणि औद्योगिक न्यायाचा विजय साधला आहे. हे यश केवळ न्याय मिळवण्याचे नसून, व्यवस्थेला कामगारांच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे उदाहरण ठरले आहे.या निर्णयामुळे १६७२ कुटुंबांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. स्थैर्य, आत्मसन्मान आणि श्रमिकांचा सन्मान मिळवून देणारा हा निर्णय म्हणजे पक्ष, संघटना आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करणाऱ्या नागरिकांचे एकत्रित यश आहे असेही ते म्हणाले.