शिवप्रहार संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी महेश टेळेपाटील यांची निवड
हडपसर | प्रतिनिधी
शिव प्रहार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद व विचार मंथन शिबिर हे दोन दिवसीय शिबिर महाबळेश्वर येथे २ व ३ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरात संघटनेच्या पुढील दिशा, कार्यपद्धती, सामाजिक सहभाग, युवाशक्तीचे संघटन आणि आधुनिक माध्यमांचा वापर यावर सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांना संघटनेची उद्दिष्टे व कार्यपद्धती प्रभावीपणे कशी राबवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष महेश टेळेपाटील यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड. त्यांच्या निवडीचे उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकत पुढील काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विविध सत्रांद्वारे संघटन कौशल्य, नेतृत्ववृत्ती, सामाजिक उत्तरदायित्व आणि रचनात्मक आंदोलन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराची सांगता प्रेरणादायी घोषवाक्य आणि नव्याने नवे संकल्प करून करण्यात आली.