पुणे

“मी अक्षय कुमार, BSF अधिकारी…” म्हणत 26 लाखांची फसवणूक! सावधान

सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बेंगळुरूमध्ये एका कंपनीची तब्बल 26 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःची ओळख बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांप्रमाणे करून दिली.
आरोपीने “अक्षय कुमार” या नावाने फोन करून कंपनीकडून मालाची ऑर्डर दिली.
विश्वास बसावा म्हणून बनावट कागदपत्रं आणि छोट्या रकमेचे व्यवहारही केले.
यानंतर हळूहळू कंपनीचा विश्वास जिंकत, आरोपींनी RTGS, NEFT आणि IMPS द्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लावले.
एकदा तर काही पैसे परत करून विश्वास आणखी वाढवला गेला.
आणि शेवटी कंपनीकडून 26 लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली.
नंतर आरोपींशी संपर्क तुटला आणि फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं.
या प्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

👉 त्यामुळे सावध राहा…
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका…
OTP किंवा बँक डिटेल्स कुणालाही देऊ नका…
आणि कोणतीही व्यवहार करण्यापूर्वी पूर्ण खात्री करा…