पुणे

अशोक खरात केस मध्ये मोठी हालचाल ….SIT तपासात मोठा ट्विस्ट..!

राज्यात मोठी खळबळ उडवणारी बातमी… Rupali Chakankar यांना अटक होणार का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाशिकमधील Ashok Kharat प्रकरणात एसआयटीचा तपास वेगाने सुरू आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे हे प्रकरण आधीच गाजत आहे.
आता तपासाचा फोकस ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवण्यात आला आहे. या संस्थेमार्फत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संस्थेशी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, Rupali Chakankar यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवले जाऊ शकतात. मात्र, त्यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
दरम्यान, या प्रकरणामुळे चाकणकर यांना आधीच दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांकडूनही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
आता एसआयटी आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि राजकीय पाठबळ या सर्व बाबींची चौकशी करत आहे.
म्हणूनच, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे… आणि सगळ्यांचे लक्ष लागले आहे—चाकणकर यांच्यावर पुढे काय कारवाई होणार?