पुणे

*”कल्याण हादरलं! ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर गंभीर अत्याचार……..!”*

कल्याणमध्ये ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेसोबत अत्याचारचा गुन्हा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कल्याण पूर्वेकडे राहणारी एक महिला सुरक्षारक्षक म्हणून काम करते. तिची ओळख एका रिक्षा चालकासोबत झाली होती.
२६ मार्च रोजी, ओळखीचा फायदा घेत त्या व्यक्तीने तिला भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर आपल्या दोन मित्रांसह तिला वेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं.

तिथे तिला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर गंभीर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हेमंत चव्हाण, चेतन चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघांना अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.