पुणे

*”जनगणना 2027! 16 वर्षांनंतर देशात पुन्हा मोठी प्रक्रिया…….!”*

तब्बल 16 वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा सर्वात मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे… जनगणना 2027!
यावेळी अनेक बदल, डिजिटल पद्धत आणि जातनिहाय माहितीची नोंद… नेमकं काय खास आहे? पाहूया! जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची अधिकृत माहिती गोळा करण्याची प्रक्रिया. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, घरांची स्थिती यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा यात समावेश होतो.यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची ‘Self Enumeration’ सुविधा दिली जाणार आहे.

https://youtube.com/shorts/YXt86KIc4oM

 

ही प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे.
पहिला टप्पा — घरांची आणि इमारतींची नोंदणी,
दुसरा — प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी,
आणि याच टप्प्यात जातनिहाय माहितीही गोळा केली जाणार आहे.एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान हाऊसिंग लिस्टिंग होईल, तर फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना केली जाईल.या जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीवरच देशातील योजना, विकासकामं आणि धोरणं ठरतात.म्हणूनच, जनगणना ही फक्त सरकारी प्रक्रिया नाही… तर देशाच्या भविष्यासाठी तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे!