हडपसरमधील पंडित जवाहरलाल नेहरू भाजीपाला मार्केटमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मार्केट पाण्याखाली गेले आहे.
जागोजागी साचलेले पाणी, तुंबलेले ड्रेनेज आणि चिखलामुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुमारे 1000 परवानाधारक व्यापारी येथे व्यवसाय करतात, पण सुविधा मात्र शून्य!
महापालिका व्यापाऱ्यांकडून रोज भाडे वसूल करते, पण प्रत्यक्षात मूलभूत सोयी देण्यात अपयशी ठरली आहे.
भाजीपाला खराब झाल्याने विक्रेत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, तर ग्राहकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींची दखल.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा व्यवस्थेचे अपयश उघड केले आहे.
आता प्रश्न असा आहे — कष्टकरी व्यापाऱ्यांना न्याय कधी मिळणार?
