पुणे

*”मरिन ड्राइव्हचे हे ब्लॉक्स फक्त फोटोसाठी नाहीत…..जाणून घ्या त्यामागचं रहस्य…!”*

मरिन ड्राइव्हवर आपण सगळे जातो…
समोर समुद्र, थंड वारा… आणि ते मोठमोठे काँक्रीटचे ब्लॉक्स.
लोक त्यावर बसतात, फोटो काढतात, सेल्फी घेतात…  पण कधी विचार केलाय का… हे ब्लॉक्स तिथे का ठेवले आहेत?

या ब्लॉक्सना “टेट्रापॉड्स” म्हणतात. समुद्राच्या मोठ्या आणि जोरदार लाटांपासून मुंबईला वाचवण्यासाठी ते खास बनवले गेले आहेत. त्यांचा आकार थोडा वेगळा असतो… चार पायांसारखा.
म्हणून ते एकमेकांत घट्ट अडकून राहतात आणि कितीही मोठी लाट आली तरी हलत नाहीत.हे टेट्रापॉड्स लाटा थांबवत नाहीत…पण लाटांची ताकद कमी करतात. लाटांची ऊर्जा तुटते, विखुरते… आणि किनाऱ्यावर येणारा जोर कमी होतो. यामुळे किनाऱ्याची झीज कमी होते, पूराचा धोका कमी होतो…
आणि शहर सुरक्षित राहतं.

 

म्हणून पुढच्या वेळी मरिन ड्राइव्हवर गेलात…
तर फक्त सेल्फी काढू नका…
या “शांत हिरोंना” एकदा नक्की बघा…
कारण हेच आहेत मुंबईचं खरं संरक्षण करणारे!