आळंदी परिसर हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे… काय आहे संपूर्ण प्रकरण?केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी भागात सहा वर्षीय चिमुरडी आणि 79 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी या 32 वर्षीय आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे.तपासात समोर आले की, आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबातील महिलेची सोशल मीडियावर ओळख होऊन विवाह झाला होता. मात्र, नात्यात तणाव वाढल्याने आरोपी संतप्त होता.घटनेच्या रात्री घरात प्रवेश करून त्याने दोघांवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या पाच तासांत आरोपीचा माग काढत अटक केली.या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांच्या जलद कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.
