पुणे

*”खरातचे धक्कादायक किस्से ……सासुरवाडीतून मोठा खुलासा!”*

भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन किस्से आता समोर येत आहेत… आणि यावेळी त्याच्या सासुरवाडीतूनच धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काय म्हणतात ग्रामस्थ?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात अशोक खरातबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. लग्नाच्या वेळीच त्याच्या वागणुकीबद्दल संशय निर्माण झाला होता, असं ग्रामस्थ सांगतात. शरीरावर जखमांचे निशाण दिसल्यानंतरही, मुलीच्या भविष्याच्या आशेने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

ग्रामस्थांच्या मते, खरात गावात फारसा वावरत नव्हता आणि त्याच्या वागणुकीतही अनेक विसंगती दिसत होत्या. काहींनी त्याच्यावर आर्थिक व्यवहारांबाबतही संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, त्याची पत्नी कल्पना खरात साध्या स्वभावाची असून, या सगळ्या प्रकरणाबाबत कुटुंबीयांनाही फारशी माहिती नसल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे पाडळी गावाचं नाव चर्चेत आलं असून, ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एकामागोमाग एक समोर येणाऱ्या या घटनांमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर होत चाललं आहे… पुढे आणखी काय उघड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.