पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघड… मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू होता अवैध व्यवसाय! पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
येरवडा पोलिसांना कल्याणीनगरमधील एका स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील ‘निरा स्पा’ येथे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली.
त्यानंतर पथकाने छापा टाकत अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी अरमान रहिमउद्दीन हुसेन या 21 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याचा सहकारी राज याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचं तपासात समोर आलं आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
