नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर!
आता नोकरी सोडल्यानंतर फक्त २ दिवसांत मिळणार तुमचे पूर्ण पैसे. Code on Wages 2019 अंतर्गत १ एप्रिल 2026 पासून हा नवा नियम लागू झाला आहे. याआधी कर्मचाऱ्यांना फायनल सेटलमेंटसाठी ३० ते ४५ दिवस वाट पाहावी लागायची.
पण आता कंपन्यांना २ दिवसांत सर्व पैसे देणे बंधनकारक आहे. फुल अँड फायनल सेटलमेंटमध्ये पगार, बोनस, भत्ते आणि इतर सुविधा यांचा समावेश होतो. तसेच, ग्रॅच्युटीचे पैसेही ठराविक कालावधीत मिळणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
