नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणात मोठी अपडेट!
Ashok Kharat याचे पोलीस कोठडीत हाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. १८ मार्चला अटक झाल्यानंतर गेल्या १७ दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
सूत्रांनुसार, विविध आजारांनी त्रस्त असलेला खरात तणावाखाली असून औषधंही त्याला साथ देत नाहीत.
सर्वात धक्कादायक म्हणजे, अवघ्या १७ दिवसांत त्याचं तब्बल ७ किलो वजन कमी झालं आहे. एकीकडे आजार आणि दुसरीकडे पोलिसांची चौकशी, अशा दुहेरी कात्रीत खरात सापडला आहे.
कधीकाळी लॅविश लाईफ जगणारा हा ‘कॅप्टन’ आता कोठडीत हतबल झाल्याचं चित्र आहे.
