पुणे शहरातील आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. खराडी परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ईशा ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमासाठी वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नोबल हॉस्पिटल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ.एच. के. साळे, डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ.राहुल झांजुर्णे, डॉ. संजय लडकत, डॉ.सचिन आबणे,
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले. या नव्या हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर, ऑर्थोपेडिक आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार हॉस्पिटलचे संचालक डॉ.राहुल नालापुरे, डॉ.शिल्पा नालापुरे, डॉ. धोंडीराम नालापुरे यांनी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे पदाधिकारी, पुणे आणि हडपसरमधील अनुभवी डॉक्टर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवांबद्दल समाधान व्यक्त करत, ही सुविधा रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, खराडी आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल आरोग्य सेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास डॉ.राहुल नालापुरे यांनी व्यक्त केला.
